नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देवगड ब्राह्मणदेव मंदिरात लघुरुद्र
देवगड/ प्रतिनिधी
कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप देवगड व जामसंडे शहराच्या वतीने शुक्रवारी सकाळी आठ वाजता देवगड येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, या संकल्पनेतून मंदिरात विधिवत ‘लघुरुद्र’ अभिषेक करण्यात आला. यावेळी नारायण राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना श्री ब्राह्मणदेवाच्या चरणी करण्यात आली.

या धार्मिक कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याप्रसंगी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, भाजप तालुका उपाध्यक्ष व नगरपंचायत स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष ॲड. प्रणाली माने, गटनेते शरद टूकरूल, भाजप महिला तालुका अध्यक्षा उषकाला केळुस्कर, महिला शहराध्यक्ष तन्वी शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर, नगरसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर, स्वरा कावले, सौ. भडसाळे, शिवाजी कांदळगावकर, श्रुती जाधव, राजा वालकर, उमेश कनेरकर, सुभाष धुरी, ॲड. व्ही. सी. खडपकर, रवींद्र कोयंडे, धर्मराज जोशी, ॲड. सिद्धेश माणगावकर, उल्हास मणचेकर, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते.

अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या लघुरुद्र अभिषेक आणि प्रार्थनेने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. राणे साहेबांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाला आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.


