खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Google search engine

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

लघुरुद्र, मोफत पेट्रोल व डिझेल वाटप आणि ‘खेळ पैठणीचा’चा रंगणार सोहळा

 

देवगड/प्रतिनिधी

कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगडमध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या उपक्रमांची घोषणा भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत केली.

धार्मिक आणि सामाजिक उपक्रम
​राणे साहेबांना उदंड आयुष्य लाभावे, या प्रार्थनेसाठी शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री देव ब्राह्मणदेव मंदिर, देवगड येथे ‘लघुरुद्र’ अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे.
​त्याचप्रमाणे, सकाळी ९.३० वाजता नगरसेवक बुवा तारी आणि नगरसेविका सौ. प्रणाली माने यांच्या माध्यमातून देवगड शहरातील रिक्षा आणि टेम्पो व्यावसायिकांसाठी मोफत १ लिटर पेट्रोल आणि १ लिटर डिझेल वितरणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे.

महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’

​महिला भगिनींच्या उत्साहासाठी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
​खास आकर्षण: १५,००० रुपये किमतीची पैठणी आणि सोन्याची नथ असे बक्षिस देण्यात येणार आहे.
​सहभागी महिला स्पर्धकांसाठी विशेष आकर्षक पारितोषिके.
​मोफत लकी ड्रॉद्वारे भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.

निमंत्रित दिंडी भजन स्पर्धा

​भजन प्रेमींसाठी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य निमंत्रित दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पारितोषिके खालीलप्रमाणे आहेत, ​प्रथम पारितोषिक: १०,०००/- रुपये व चषक, ​द्वितीय पारितोषिक: ७,०००/- रुपये व चषक, ​तृतीय पारितोषिक: ५,०००/- रुपये व चषक देण्यात येणार आहे.

तालुक्यातील सर्व महिलांनी ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाला आणि भजन प्रेमींनी दिंडी स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, माजी भाजपा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, महिला मोर्चा अध्यक्ष उषःकला केळुस्कर, आणि महिला शहराध्यक्ष तन्वी शिंदे यांनी केले आहे.
​या पत्रकार परिषदेला देवगडमधील आजी-माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.