युवराज्ञी संयोगीताराजे संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Google search engine

युवराज्ञी संयोगीताराजे संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

देवगड महाविद्यालयात १३ व १४ मार्च रोजी राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद

​देवगड / प्रतिनिधी
येथील श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि सोलापूर इतिहास संशोधन मंडळ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी १३ आणि १४ मार्च २०२६ रोजी “भारताच्या निर्मितीत महिलांचे योगदान आणि कोकण पर्यटन” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

​या परिषदेचे उद्घाटन युवराज्ञी संयोगीताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेत प्रामुख्याने डॉ. गोपाळ राजगुरू (जेएनयू, दिल्ली), डॉ. उमेश बगाडे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. संदेश वाघ, डॉ. सुरेश मैंद (मुंबई विद्यापीठ), डॉ. सुधाकर लहुपचांग, डॉ. डी.पी. गायकवाड, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विकास शिंदे, डॉ. दिगंबर वाघमारे आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांसारखे नामवंत अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

​या परिषदेचा मुख्य उद्देश इतिहास, समाजशास्त्र, साहित्य, विज्ञान, शिक्षण आणि पर्यावरण अशा विविध विषयांवरील संशोधकांना एकत्र आणून ज्ञानविनिमय करणे हा आहे. देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील तज्ज्ञ आपले संशोधन निबंध येथे सादर करणार आहेत. यामुळे संशोधन संस्कृतीला चालना मिळण्यास मदत होईल, असे आयोजकांनी म्हटले आहे.

​या राष्ट्रीय परिषदेसाठी संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे आणि उपप्राचार्य तथा परिषदेचे समन्वयक प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी केले आहे.