अभ्यासाची भीती सोडा, तंत्र आत्मसात करा!
भगवती हायस्कूलमध्ये रंगला विद्यार्थी-पालक ‘संवाद’

प्रशांत वाडेकर : देवगड
दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील अभ्यासाचा ताण कमी करून त्यांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी भगवती माध्यमिक विद्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. बेतकेकर यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या उदाहरणांतून ‘Hearing’ आणि ‘Listening’ मधील फरक स्पष्ट करत बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी सकारात्मक वृत्तीची कशी गरज असते, याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्ट, सिंधुदुर्ग आणि इनामदार श्री देवी भगवती संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवती माध्यमिक विद्यालय, कोटकामते ता. देवगड येथे रविवार दि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी संवाद – एका जेष्ठ शिक्षण तज्ज्ञाशी हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम ८वी, ९वी आणि १०वीचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे प्रबोधन या दृष्ठिने आयोजित केला होता.
सुरवातीला कोटकामते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरण राऊळ सर यांनी प्रास्ताविक व स्वागत परिचय केले. त्यानंतर संघटनमंत्र, दीप प्रज्वलन, स्वागत, प्रार्थना झाल्यावर कार्यक्रमांचे मुख्य मार्गदर्शक जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ श्री. बेतकेकर सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सुरवातीला आनंदी मनाने सकारात्मक वृत्तीने अभ्यास तसेच कोणतीही गोष्ट आपण साध्य करु शकतो. तसेच कोणतेही काम लक्षपूर्वक केले तरच आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. असे सांगताना माणसाच्या मेंदूमध्ये अनेक चांगली वं वाईट रसायने तयार होतं असतात. आनंदी मनाने काम केल्यास त्यातील चांगली रसायने आपली बुद्धी तल्लख ठेवतात. तसेच Hearing आणि listening यातील फरक उदाहरणने स्पष्ट केला. शिक्षक वर्गात शिकवत असताना पूर्ण लक्ष देऊन अभ्यास केल्यास आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. मुलांकडून त्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती विचारून घेतल्या. अभ्यास करणे म्हणजे केवळ वाचणे व पाठांतर करणे अशा दोनच पद्धती बहुतांश विद्यार्थी वापरतात. याबाबत माहिती देताना एकूण १० प्रकारे अभ्यास करता येतो असं सांगत माईंड मॅप, मेक अ चार्ट इत्यादी २-३ प्रकाराची माहिती देऊन वेळेअभावी बाकी प्रकार गुगल वर सर्च करून माहिती मिळवावी असे आवाहन करून या विविध पदधतीचा उपयोग केल्यास अभ्यास करणे सोपे आणि सुलभ आनंददायी होइल. असे अभ्यास कौशल्याबाबत माहिती देताना सांगितले. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी परिश्रम, मेहनत करावी लागते. हे व्यवहारातील उदाहरणे देऊन लक्षात आणून दिले. तसेच विद्यार्थ्यांकडे ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीची
आवश्यकता असते ते सांगितले (ज्ञान, तृष्णा, गुरुनिष्ठा…) या सुभाषिताचा संदर्भ देऊन विषद केल्या. तसेच विपरीत परिस्थिती मधेही विशिष्ट ध्येयाने प्रेरित
होऊन स्वतः अभ्यास करून स्वतःचे करियर कसे घडवले अशी समाजातील उदाहरणे समोर ठेवून आपणही आपल्या पालकांना अभिमान वाटावा असे स्वतः चे उज्वल भविष्य घडवावे असे आवाहन केले. अगदी सामान्य परिस्थिती असतानाही स्वतःचे चांगले करियर घडवल्याची काही उदाहरणे देऊन प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांचे शिक्षकांचे परिश्रम मेहनत लक्षत ठेऊन आपण आपल्या इच्छेप्रमाणे काही स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन त्या दिशेने मेहनत परिश्रम करण्याचे आवाहन केले.
दुसरं सत्र विद्यार्थी व पालक असे एकत्रित झाले. त्यामध्ये एखादे झाडं लावण्यासाठी आपण विविध प्रकारचे साहित्य जमा करून झाडं लावून आवश्यक ती मेहनत घेतल्यानंतरच फळ मिळते. त्याप्रमाणे आपली मुले हीच आपली संपत्ती असून तिच्यावर लक्ष ठेवणे, ज्याप्रमाणे आपण आपल्या शेताची काळजी घेतो, मेहनत करतो त्याप्रमाणेच आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी आपणच मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन केले.
मुलांना मोबाईल वापराबाबत सांगताना मोबाईलचा वापर चुकीच्या कारणासाठी केला गेल्यामुळे काही कालावधीमध्ये देशाच्या विविध भागामध्ये घडलेल्या घटना (विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, घरातील जवळच्या व्यक्तींच्या केलेल्या हत्त्या) सांगून विद्यार्थ्यांना मोबाईल गेम्समुळे होत असलेले दुष्परीणाम सांगत मोबाईलचे गुलाम न होता मोबाईलचा वापर अनेक चांगल्या उपयोगी गोष्टी शिकण्यासाठी कसा करता येतो, त्याचीही माहिती देऊन विदयार्थ्यांना सकारात्मक दृष्टीने मोबाईलकडे पाह्या असं सांगितले. आपल्याच परिसरातील सामान्य पालकाने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी – विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याने आज त्यांची मुले चांगल करियर करत आहेत हे उदाहरणासह सांगितले. शेवटी श्री बेतकेकर सर यांनी विदयार्थ्यांना उज्वल भविष्य घडवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राऊळ सर यांनी आभार प्रदर्शन करूनं कार्यक्रमांची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी माजी विदयार्थी ८वी ते १०वी मुलगे २५ + मुली २१ = ४६, व्यवसायिक माजी विद्यार्थी ४, पालक पुरुष २० + स्त्री १५ = ३५, शिक्षक / कर्मचारी ०७, कार्यकर्ते ५ असे एकूण ९७ जणं उपस्थित होते. यामध्ये श्री भगवती देवी संस्थान कर्कोटकामते चे पदाधिकारी, तसेच भगवती हायय्कूल कोटकामतेचे पदाधिकारी व सेवा भारतीचे प्रांत कार्यकर्ते श्री. हेमंतजी आईर, सेवा भारती जिल्हा सचिव, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प प्रमुख, प्रकल्प शिक्षक तसेच परिसरातीलं शिक्षक उपस्थित होते. श्री. बेतकेकर सरांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वाना विषयासंदर्भात बोलते करून सहभागी करून घेतले. शाळेच्या तसेच देवस्थानच्या वतीने संतोष मेस्त्री,गुरुदास घाडी,
श्री. लक्ष्मण पाटकरश्री महेंद्र मेस्त्री, मुख्याध्यापक श्री राऊळआणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.



