रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या चार्टर विमानाचा अपघात; ७ जणांचा मृत्यू
रांची: वृत्तसंस्था
-झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झाला आहे.
या विमानात चालक दलातील दोन सदस्यांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात कोसळलं.
या अपघातानंतर एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
या विमानातून एका होरपळलेल्या रुग्णाला दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात येतं होतं.


