- देवगड तालुक्यात ‘शिवजन्मोत्सव २०२६’ निमित्त शिवप्रेमी मंडळांना गावभेटी
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचा उपक्रम
देवगड : प्रशांत वाडेकर
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने देवगड तालुक्यातील विविध शिवप्रेमी मंडळांना सदिच्छा भेटी देऊन अभिवादन करण्यात आले.
किल्ले विजयदुर्ग दीपोत्सवात सक्रीय सहभाग नोंदवणाऱ्या आणि तालुक्यातील प्रसिद्ध शिवप्रेमी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा गावभेट कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला.
प्रमुख मंडळांना भेटी आणि सत्कार विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील खालील प्रमुख मंडळांना भेटी देऊन छत्रपती शिवरायांना वंदन केले.
श्री नवलादेवी शिवभक्त उत्साही ग्रामस्थ मंडळ, सडेवाघोटण, शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ, नाडण वरची पुजारेवाडी, श्री काळकाईदेवी क्रिकेट मंडळ, कलंबई, शिवाजी तरुण मंडळ, बाऊळवाडी-सौंदाळे, गिर्ये कोठारवाडी विकास मंडळ, चौगचारवाडी मित्रमंडळ, विजयदुर्ग
यावेळी सर्व शिवप्रेमी मंडळांनी विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या सदस्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मंडळाच्या वतीने श्रीफळ आणि शाल देऊन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, शिवजयंती उत्सव मंडळ, कलंबईच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा देऊन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला.
उत्साही वातावरण आणि रोषणाई
तालुक्यात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, मनमोहक रांगोळ्या आणि ऐतिहासिक सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
या गावभेट कार्यक्रमाला विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष नितीन जावकर, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, कार्याध्यक्ष राजाराम सकपाळ, सचिव योगिता परुळेकर, सहसचिव छाया पटेल यांच्यासह अभिजीत जावकर, बाळगौरव मणचेकर, प्रियांका निकम, जयवंत डोंगरे, गौरी मणचेकर, सत्यवान कदम, प्रियांका कदम, सारिका मणचेकर, नेहा बिर्जे, सिद्धी मणचेकर, तन्वी मणचेकर, वेदांती ढमाले, समर्थ निकम आणि मनीष जाधव उपस्थित होते.
जाहिरातींसाठी संपर्क: 9850245116


