देवगड-जामसंडे शहरातील ९ अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी २२ लाखांचा निधी मंजूर!

Google search engine

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

कर्मचारी अन् पालकांत आनंदाचे वातावरण

 

देवगड / प्रतिनिधी 

देवगड-जामसंडे शहरातील ९ अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी २२ लाख रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे.

​मंजुरीचे हे पत्र मा. पालकमंत्र्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सिंधुदुर्ग-रत्नागिरी व उपस्थित अंगणवाडी सेविकांकडे नुकतेच सुपूर्द केले. येत्या काही दिवसांतच या दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने, गेली अनेक दिवस प्रलंबित असलेला अंगणवाड्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यामुळे अंगणवाडी कर्मचारी, सेविका आणि पालकवर्गामध्ये अतिशय समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पत्र सुपूर्द करताना बालविकास अधिकारी व अंगणवाडी सेविकांसह भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरल, शक्तिकेंद्र प्रमुख सुभाष धुरी, बापू जुवाटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

​अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरवस्थेची दखल घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

मंजूर झालेल्या ९ अंगणवाड्या:

  1. देवगड किल्ला
  2. देवगड साटमवाडी
  3. देवगड बाजारपेठ
  4. जामसंडे वडांबा
  5. जामसंडे टिळकनगर
  6. जामसंडे मळई
  7. जामसंडे तरवाडी
  8. जामसंडे भटवाडी
  9. जामसंडे वेळवाडी