देवगडात आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Google search engine

देवगडात आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

देवगड / प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग व श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसन विकास मंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व योगा, मानसिक आरोग्य जीवनशैली शिबिर देवगड येथे स्नेहसंवर्धक सभागृह, उमा बर्वे लायब्ररी येथे संपन्न झाले.
या स्थळावरच देवगडचा आठवडी बाजार भरला असल्याने बाजारहाट व आरोग्य तपासणी अशी दोन्ही कामे सहजच झाल्यामुळे चांगलाच प्रतिसाद शिबिरास मिळाला.


मोफत आरोग्य तपासणी मध्ये बीपी तपासणी, शुगर तपासणी ,डोळे तपासणी, नाक, कान व घसा तपासणी, इसीजी तपासणी, सीबीसी रक्त तपासणी व डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन मिळाले. योग शिबिर ध्यान सत्र मानसिक आरोग्य व समुपदेशन, आहार असे आरोग्य व जीवनशैलीचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे निमंत्रक डॉ.गणेश उर्फ भाई बांदकर – अध्यक्ष : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ देवगड हे होते व त्यांनी योग्य व्यवस्थेत हे शिबिर यशस्वी केले.

या शिबिरास सौजन्य जेष्ठ नागरिक सेवा संघ- देवगड, गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली, सरस्वती फाउंडेशन कणकवली व श्री योगेश पाटील यांचे लाभले.
या शिबिरास प्रमुख उपस्थिती जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या पदाधिकाऱी सुगंधा देवरूखकर व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ देवगड चे अध्यक्ष डॉ.भाई बांदकर, खजिनदार श्री.राजेंद्र हिंदळेकर, सदस्य श्री.पांचाळ तसेच ज्येष्ठ लेखिका गीता लळीत यांची होती.
शिबिरामध्ये मुख्य कार्यरतामध्ये डॉक्टर व मेडिकल स्टाफ ग्रामीण रुग्णालय देवगडच्या
डॉ. रूपाली पोकळे – वैद्यकीय अधिकारी, श्रीम. शिवानी चिवटे – ऑपथेल्मिक ऑफिसर, श्रीम. दिव्या आठवले – नेत्र चिकित्सक अधिकारी, श्रीम. पल्लवी कुडवे – आरोग्य मित्र, श्रीम. पुनम घाडी – NCD स्टाफ नर्स, श्रीम. आकांक्षा घाडी – लॅब टेक्निशियन, श्री .मयूर जाधव – परिचर

तसेच कणकवलीतील बिरमोळे हाॅस्पिटलमधून उज्वला नाईक -लॅब सिस्टर, सुजाता रावराणे -कॅम्प व्यवस्थापक, डॉ गणेश गोरे RMD (Doctor), रश्मी नाईक – ARM, प्रियांका पांगम – ARM, नंदू सावंत
या सर्व मेडिकल स्टाफने हे शिबिर यशस्वी केले तसेच श्री प्रशांत बांदकर व श्री.वराडकर तसेच मार्गदर्शक संस्थेचा स्टाफ हर्षदा चव्हाण व सुकन्या माळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.