सोहनीवाडी येथे स्ट्रीट लाईट झाल्यामुळे रस्ता झाला प्रकाशमान

Google search engine

सोहनीवाडी येथे स्ट्रीट लाईट झाल्यामुळे रस्ता झाला प्रकाशमान

भाजपा माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांनी स्वखर्चाने बसवली स्ट्रीट लाईट

ग्रामस्थांनी मानले पाटकर यांचे आभार

 

देवगड / प्रतिनिधी

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १४ मधील सोहनी वाडी मधे रस्त्याच्या बाजूला स्ट्रिट लाईट लावण्याची मागणी केली होती. या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांनी ग्रामस्थांच्या मागणी नुसार गरज लक्षात घेऊन स्वखर्चाने स्ट्रीट लाइट बसवून दिले.

या स्ट्रीट लाईटमुळे रात्रीच्यावेळी गावात येताना ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर झाली. स्ट्रीट लाईटमुळे सोहनीवाडी रस्ता प्रकाशमान झाला. याबाबत सोहनीवाडी ग्रामस्थांनी श्री. पाटकर यांचे आभार मानले आहेत.