श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल येथे विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव
पडेल / प्रतिनिधी
पडेल ग्रामसुधारणा मंडळ, मुंबई संचलित श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल येथे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी निबंध स्पर्धा, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा दीक्षित फाउंडेशनचे श्री. निरंजन दीक्षित यांच्या माध्यमातून झाला.
कार्यक्रमास शाळा समितीचे चेअरमन श्री. दीपक पडेलकर, पडेल ग्रामसुधारणा मंडळ, मुंबईचे खजिनदार श्री. दत्ताराम बाणे, तसेच माजी पर्यवेक्षक व माजी सरपंच श्री. विकास दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्पर्धांमधील सहभागामुळे आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास व सर्जनशीलतेला चालना मिळते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी केले तर आभार श्री अजित जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या लोहार मॅडम यांनी केले. स्पर्धा आयोजन इंग्रजी विभाग विद्या लोहार मॅडम,अजित जाधव सर, अमृता खवळे मॅडम यांनी तर चित्रकला स्पर्धा कलाशिक्षक श्री दत्ताराम कोकरे सर यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली पाच वर्षे सातत्याने या शाळेत दीक्षित फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


