तारामुंबरी येथून श्री संत सोपान महाराज आषाढी पायीवारीचे उद्या प्रस्थान

Google search engine

तारामुंबरी येथून श्री संत सोपान महाराज आषाढी पायीवारीचे उद्या प्रस्थान

सलग दुसऱ्या वर्षी पायीवारीचे तारामुंबरी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथून आयोजन

 

देवगड : प्रतिनिधी 

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तारामुंबरी यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी श्री संत सोपान महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याची सुरुवात उद्या बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तारामुंबरी येथे विधीवत देवता व वीणा पूजनाने होणार आहे. पंचपदीनंतर सकाळी ९ वाजता पायी वारीचे प्रस्थान होईल.

तारामुंबरी नाक्यावरून मुख्य मार्गाने वारी पुढे मार्गक्रमण करीत श्री संत बाळूमामा देवालय, कोंडामा येथे दुपारच्या महाप्रसादासाठी विसावेल. त्यानंतर रात्रीचा मुक्काम श्री स्वामी समर्थ मंदिर, हडपीड येथे असेल.
ही पायी वारी रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सासवड येथे मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी होऊन श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी रथामागे दिंडी क्रमांक ८२ सहभागी असून दि. २३ जुलै रोजी पंढरपूर येथे मुक्काम असेल.

त्यानंतर दि. २७ जुलै रोजी परतीच्या प्रवासानंतर पायी वारीची सांगता होणार आहे. सांगता सोहळा श्री ब्राह्मणदेव मंदिर ते तारामुंबरी असा संपन्न होईल. यावेळी दुपारी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात गंगापूजन होईल. महाप्रसादाचे आयोजन मंदिराचे होडेकरी-मानकरी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

या पवित्र पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिंडी अध्यक्ष ह.भ.प. श्री नामदेव महाराज तळवडकर तसेच श्री विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत जोशी यांनी केले आहे.