मुसळधार पावसात देवगड-वेळवाडी येथील बंधाऱ्याचे काम सुरू

Google search engine

मुसळधार पावसात देवगड-वेळवाडी येथील बंधाऱ्याचे काम सुरू

मनसे शहर अध्यक्ष अभिजित तेली यांची चौकशीची मागणी

देवगड: प्रतिनिधी 

येथील वेळवाडी भागात मुसळधार पाऊस सुरू असतानाही बंधाऱ्याचे सिमेंट काँक्रीटचे काम ठेकेदाराकडून सुरू ठेवण्यात आले आहे. पावसामुळे सिमेंट वाहून जाऊन बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी मनसे देवगड  शहर अध्यक्ष अभिजित तेली यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

​याबाबत त्यांनी खारभूमी विकास उपविभागाच्या शाखा अभियंत्यांना निवेदन दिले आहे. पावसाळ्यात अशी कामे करणे नियमांचे उल्लंघन ठरेल आणि यामुळे भविष्यात बंधारा फुटण्याचा धोका आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.