कर्तव्याची सावली आणि आपुलकीची छत्री!
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर यांचा उपक्रम
प्रभाग क्र. १४ मधील प्रत्येक घराघरांत छत्री वाटप
देवगड /प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रत्येक घराघरात जाऊन मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. भाजपचे माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर यांच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने नागरिकांची हीच मुख्य गरज ओळखून योगेश पाटकर यांनी प्रभागातील जनतेला चांगल्या दर्जाच्या छत्र्या उपलब्ध करून दिल्या. कोणताही जाहीर कार्यक्रम न करता श्री. पाटकर यांनी स्वतः प्रभाग क्रमांक १४ मधील प्रत्येक घराघरात जाऊन या छत्र्यांचे थेट वाटप केले.
या छत्र्या वाटप उपक्रमाची सुरुवात प्रभाग क्र. १४ मधील धोपटेवाडी येथून करण्यात आली. ऐन पावसाळ्यात लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त थेट दारात येऊन मिळालेल्या या गरजेच्या वस्तूमुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या उपक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


