जामसंडे गणेशनगर बलवान बेकरीसमोर भीषण अपघात
रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या गाडीला दुचाकीने ठोकले
दुचाकीस्वार सह दोघे गंभीर
देवगड / प्रतिनिधी
जमसंडे गणेश नगर बेकरी समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार व त्याच्या पाठीमागे बसलेले दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २.४५ वा . सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमींना देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड नांदगाव मार्गावरील जामसंडे गणेश नगर येथील बलवान बेकरी समोर हा अपघात झाला. देवगड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे हे रस्त्याच्या बाजूला आपली क्रेटा गाडी लावून बेकरी मधे गेले होते. त्याच दरम्यान देवगडहून जामसंडेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाडीला जोरदार धडक दिली ही धडक एवढी मोठी होती की दोन्ही रस्त्यावर फेकले गेले. दोघांचेही डोक्याला तसेच हाताला गंभीर दुखापत झाली दोघांनाही उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती बंगडे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालय दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.


