देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार, विकासाला विरोध करू नका

Google search engine

देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार, विकासाला विरोध करू नका

खासदार नारायण राणेंनी देवगड भेटीमध्ये विरोधकांना फटकारले

कार्यकर्ते व नागरिकांचे प्रश्न घेतले जाणून घेत माहिती घेतली

 

देवगड / प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांनी आज देवगड येथील भाजपा कार्यालयाला भेट देऊन नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना अणुऊर्जा प्रकल्प देवगडमध्ये होणार आहे. विकासासाठी कोणीही विरोध करू नये, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.

यावेळी विविध व्यक्तींकडून त्यांनी निवेदने स्वीकारून त्यावर सविस्तर चर्चा केली. मच्छीमार बोटींसाठी पुरवठा होणाऱ्या डिझेलच्या वर्गीकरणासंदर्भातील प्रश्नांबाबत मच्छीमार प्रतिनिधींनी खासदार राणे यांची भेट घेतली. या विषयाचा पाठपुरावा करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी मच्छीमारांना दिले.

देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी खासदार नारायण राणे यांचा सत्कार केला. तसेच भाजपा तालुका समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजा भूजबळ यांनीही त्यांचा सत्कार केला. शहराच्या वतीने शरद ठुकरुल व सर्व नगरसेवकांनी खासदार राणे यांचे स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी शिवसेनेच्या वतीने विविध विकासकामांसंदर्भातील निवेदन खासदार नारायण राणे यांना सादर केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार ॲड. अजित गोगटे, मिलिंद कुलकर्णी, जेष्ठ नेते बाळ खडपे, जि. प. बांधकाम सभापती सौ. अनुराधा नारकर,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील. पडेल मंडळ माजी अध्यक्ष डॉ. अमोल तेली, नगरसेवक तथा गटनेते शरद ठुकरुल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, नगरसेवक संतोष तारी, चंद्रकांत कावले, नगरसेविका ॲड. प्रणाली माने, मनीषा जामसंडेकर, आद्या गुमास्ते, माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर, जि. प. गटनेते संजय बोंबडी, जि. प. सदस्या सौ. अवनी तेली, सौ . सावी लोके, कु. सुयोगी घाडी, देवदत्त कदम तसेच पंचायत समिती सदस्य अंकुश टूकरूल, समृध्दी चव्हाण, संजना लाड, सादिक डोंगरकर, पडेल सरपंच भूषण पोकळे, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, रवींद्र पेडणेकर, किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते.