​पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ९ मध्ये मोफत छत्री वाटप

Google search engine

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ९ मध्ये मोफत छत्री वाटप

नगरसेविका ॲड. प्रणाली माने व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांचे आयोजन

उपक्रमाचा २१३ नागरिकांनी घेतला लाभ

देवगड: प्रतिनिधी 

मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा देवगड-कणकवली-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्र ९ मधील नागरिकांना माजी आमदार ॲड अजित गोगटे व भाजपचे जेष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते मोफत छत्र्या वाटप करण्यात आले.

नगरसेविका व माजी नगराध्यक्षा ॲड. प्रणाली माने यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्रभाग क्र ९ मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे २१३ महिला व पुरुष नागरिकांनी लाभ घेतला. या समाजपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.

​जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे लाडके आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नागरिकांसाठी छत्री वाटप या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, मिलिंद माने आदी उपस्थित होते.