टीजेएसबी सहकारी बँकेच्या
वेंगुर्ला शाखेचा उद्या स्थलांतर सोहळा
वेंगुर्ला / प्रतिनिधी
बँकिंग क्षेत्रात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपल्या उत्कृष्ट सेवेचा ठसा उमटवणारी ‘टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड’ (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) आपल्या वेंगुर्ला शाखेचे नवीन जागेत स्थलांतर करत आहे. या नवीन शाखेचा शानदार स्थलांतर सोहळा १५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि अधिक उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या कटिबद्धतेतून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप यांच्या शुभहस्ते या नूतन शाखेचा उद्घाटन व स्थलांतर सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याप्रसंगी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल आरेकर हे उपस्थित राहणार आहे.
वेंगुर्ला शाखेचे नवे ठिकाण
टीजेएसबी सहकारी बँक लि., शाखा: वेंगुर्ला, प्लॉट नं. ३०३ ए, खर्डेकर रोड, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग याठिकाणी आहे.
या स्थलांतर सोहळ्यास सर्व ग्राहक, हितचिंतक आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.


