बेपत्ता तरुणाचा मिठमुंबरी बौद्धवाडी खाडीपात्रात मृतदेह सापडला

Google search engine
  • बेपत्ता तरुणाचा मिठमुंबरी बौद्धवाडी खाडीपात्रात मृतदेह सापडला

देवगड / प्रतिनिधी
देवगड मिठमुंबरी समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवक चैतन्य राजेंद्र गुरव (२१) याचा मृतदेह मिठमुंबरी खाडी पात्रात सोमवारी सायंकाळी ६ वा आढळला. मृतदेह खाडीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना दिसून आला. मृतदेह किनाऱ्यावर आणण्यासाठी पोलिस व ग्रामस्थ गेले होते.