मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Google search engine

मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अध्यक्ष काका ढोके, किरण टेंबुलकर, उमेश कुलकर्णी आदींचा यांचा समावेश

 

देवगड : प्रतिनिधी 

आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी काढण्यात येणारा मोर्चा होऊ न दिल्याचे कारण देत आंबा व काजू बागायतदार यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रकरणी देवगड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आंबा हंगामातील नुकसान भरपाईच्या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. मोर्चाच्यावेळी सरकारकडून अमानुष वागणुकीचा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देवगड परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांच्यासह गणेश वाळके, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेंबुलकर, राजेश पाटील, विजय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, उबा ठा चे स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे, उबाठाचे तेजस मामघाडी, प्रसाद दुखंडे आदी सहभागी झाले होते.

दरम्यान, देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राज्य महामार्गावर पुतळा दहन करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवगड पोलीस करत आहेत.