भटवाडी तारांगण पार्कमधील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
नगराध्यक्षांची उपस्थिती : नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या विशेष प्रयत्नातून कामांना गती
सावंतवाडी / प्रतिनिधी
येथील पालिकेने शहरात विविध विकासकामांचा सपाटा लावला आहे. आज भटवाडी तारांगण पार्कमधील रस्ता कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते झाले. तर मधुसूदन कशाळीकर निवासस्थान परिसरातील नाल्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन महिला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेवक बाबू कुडतडकर, नगरसेविका सुनीता पेडणेकर, नगरसेवक तौकीर शेख, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, वैभव केंकरे, स्मिता केंकरे, सुमुख केंकरे, प्रसन्न राणे, मधुसूदन कशाळीकर, उल्का सांगेलकर, मीनाक्षी आयरे, सतीश सुभेदार, हर्षद कशाळीकर, गुरुप्रसाद तेजम, मनोज राऊळ, नितीन धामापूरकर, नंदकुमार प्रभू देसाई, ए. पी. चव्हाण, नेत्रा नागराज, नितीन धामापूरकर, रमेश गावडे, सुवर्णा प्रभुदेसाई, शांभवी तेंडूलकर, विजयकुमार पाटील, प्रसाद नाईक, अनघा चव्हाण, संकल्प तेंडुलकर, श्री. मठकर, श्री. डान्टस, नितीन सामंत, बंड्या कुलकर्णी, महेश पाटील आदी उपस्थित होते. तारांगण पार्क परिसरात राहणाऱ्या नागरिकांची रस्त्याबाबतची अनेक वर्षे मागणी होती. या नवीन रस्त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नगराध्यक्ष सावंत भोसले यांनी सांगितले की, शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून, प्रभागातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी ग्वाही दिली.
भटवाडी तारांगण पार्कमधील रस्ता आणि मधुसूदन कशाळीकर निवासस्थान परिसरातील नाल्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हे महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागत आहेत. मधुसूदन कशाळीकर यांच्या घराजवळील नाल्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या हस्ते झाले. पावसाळ्यात या नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता काँक्रिटीकरणामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यावर आमचा भर आहे, जेणेकरून रहिवाशांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही. प्रभागातील स्वच्छतेसाठी आणि सांडपाण्याच्या नियोजनासाठी हे काँक्रिटीकरण अत्यंत गरजेचे होते, असे भालेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


