मोंड विद्यालयात १० वी, १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

Google search engine

मोंड विद्यालयात १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

देवगड /प्रतिनिधी 

मोंड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक विद्यामंदिर व श्री. नामदेव मोतिराम माणगांवकर कला, वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, मोंड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील १० वी आणि १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी पार पडला.

​या कार्यक्रमात परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गणेशजी राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री. अभय जयंत बापट, संचालक श्री. विश्वास साटम, श्री. शामसुंदर मुणगेकर, श्री. प्रसाद कार्लेकर, इतर संचालक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. आसावरी कदम उपस्थित होते.

​अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. गणेशजी राणे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “मोंडसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणतीही बाह्य शिकवणी नसताना आणि घरची जबाबदारी सांभाळून मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल विद्यार्थी व पालकांचे विशेष अभिनंदन.”
​तसेच, श्री. नामदेव मोतिराम माणगांवकर चॅरीटेबल ट्रस्टचे श्री. विवेकजी माणगांवकर यांच्या सहकार्यातून महाविद्यालयात भविष्यात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील उच्च शिक्षण याच महाविद्यालयात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

​कार्यक्रमाच्या शेवटी सचिव श्री. अभय बापट यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उपस्थितांचे आभार मानले.