कोटकामते खुडी येथील शेतकरी व ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

Google search engine

कोटकामते खुडी येथील शेतकरी व ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

  पंचायत समिती देवगड सभापती गणेश राणे यांची यशस्वी मध्यस्थी

 

देवगड / प्रतिनिधी 

       देवगड तालुक्यातील कोटकामते खुडी येथील २२ शेतकरी व ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “न्याय भिक्षा आंदोलन” करण्याचा इशारा दिला होता. मात्र पंचायत समिती देवगडचे सभापती श्री. गणेश राणे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.

       दि. ३० एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती देवगड सभापती दालनात श्री. गणेश राणे यांच्या उपस्थितीत शेतकरी व ग्रामस्थांसोबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याबाबत आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कोटकामते खुडी येथील ग्रामस्थांनी १ मे रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

     यासंदर्भात ग्रामस्थांनी सभापती श्री. गणेश राणे यांना निवेदन सादर करून आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे कळविले. सभापती गणेश राणे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि मध्यस्थीमुळे आंदोलन टळल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

       यावेळी विस्तारअधिकारी ( ग्रा.प ) तुषार हळदणकर , स्वीय सहाय्यक दिपक मयेकर , सहाय्यक अभियंता रोशन सुर्यवंशी आदी उपस्थित होते .