‘गो सन्मानार्थ देवगड मधून ८७१ सह्यांचे तहसीलदारांना निवेदन
देवगड /प्रतिनिधी
देशातील देशी गोवंशाला सुरक्षा, दल सन्मान आणि संवैधानिक दर्जा मिळावा या मागणीसाठी देवगड येथे ‘गो सन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत ८७१ सह्यांचे तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले.
हे अभियान स्थानिक गोभक्त, संत समाज आणि नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आले. यावेळी प्रचारक संत राजाराम यशवंत परब, गो सन्मान अभियान निवेदक सौ. वैदेही उपेंद्र ओगले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगड कार्यवाह महेश कानेटकर, राष्ट्रसेविका समिती कार्यवाहिका मंगलताई बिड्ये, भाजपचे जेष्ट नेते बाळ खडपे, नगरसेवक शरद टूकरूल, भाजपा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिठबांव उपखंड प्रमुख सुनील बापट, राष्ट्र सेवा भरतीचे भगीरथ राणे, प्रशांत बिडये, प्रशांत घाडी, दत्ताराम घाडी आदी उपस्थित होते.


