ठाकरे गटाला मोठे खिंडार; वाडा गावातील कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश!

Google search engine

ठाकरे गटाला मोठे खिंडार

वाडा येथील कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश!

 

देवगड/ प्रतिनिधी
पडेल जिल्हा परिषद मतदारसंघातील वाडा गावातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

या पक्षप्रवेशावेळी भाजप पडेल मंडल अध्यक्ष महेश ऊर्फ बंड्या नारकर, कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पडेल सरपंच भूषण पोकळे, अविनाश सहस्त्रबुद्धे, आशिष जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पक्ष प्रवेश केलेले कार्यकर्ते:
सुहास वाडेकर, शशांक तावडे, स्नेहल मेस्त्री, सत्यवान मेस्त्री, रघुनाथ वाडेकर, राजेंद्र वाडेकर, निमेश परब, सतीश परब, सर्वेश परब, संतोष वाडेकर, राजेंद्र वाडेकर, सुशांत पांचाळ, संतोष मेस्त्री, हेमंत पांचाळ, शरद मेस्त्री आणि विजय पांचाळ या सर्व कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भाजपचे कमळ हाती घेतले आहे.