देवगड महाविद्यालयामध्ये मराठी भाषा दिन उत्साहात
ग्रंथ परीक्षण, ऑनलाइन प्रश्नमंजुषा , जिल्हास्तरीय निबंध (माध्यमिक गट व महाविद्यालयीन गट) तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
देवगड : प्रशांत वाडेकर
शिक्षण विकास मंडळ देवगड संचलित श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगड, श्रीमती न. शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय,देवगड व मराठी वाड्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा गौरव दिन सोहळा मोठ्या उत्साहात देवगड महाविद्यालयाच्या कौन्सिल सभागृहात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कुसुमाग्रज ( वि.वा. शिरवाडकर )यांच्या जन्मदिनीआयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सुसंस्कारक व स्वागताने प्रा. राजेश तेली यांनी केली. प्रा.संतोष गिडये यांनी मान्यवरांना रोपवाटिका देऊन त्यांचे स्वागत केले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि.बी.कुनुरे यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य (प्रशासन) प्रा.श्रीकांत सिरसाठे,उपप्राचार्य डॉ .लक्ष्मण सुरवसे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.पारस जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष गिडये यांनी केले त्यानंतर कु. आर्या जोईल, कु. प्रसिद्धी जोईल, कु. वैभवी परब, कु. सावली घाडी,कु.अनुष्का पोकळे यांनी आपल्या भाषणात मराठीची समृद्ध परंपरा आणि कुसुमाग्रज्यांच्या साहित्याचा महिमा वर्णन करत उपस्थितांची मने जिंकली.
उपप्राचार्य प्रा.श्रीकांत सिरसाठे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठीचा डंका समुद्रापार नेणाऱ्या सर्व साहित्यांचा मला सार्थ अभिमान आहे असे संबोधित करत ते पुढे म्हणाले की मराठीच्या बोलीभाषा ह्या रक्तवाहिन्यासारख्या आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी कुसुमाग्रजांचा संपूर्ण जीवनपट तसेच त्यांच्या अलौकिक साहित्यकृतीबद्दल संबोधन केले. अभिजात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयामध्ये ग्रंथ परीक्षण स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा,(माध्यमिक गट व महाविद्यालयीन गट) तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व गट या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.निकाल खालील प्रमाणे:
*पुस्तक परीक्षण स्पर्धा*( महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी)- २१ जानेवारी २०२६
प्रथम क्रमांकः मोहिनी उदय शिरगावकर (TYBSC IT)
द्वितीय क्रमांकः खेहल संजय बापट (FYBSc IT)
तृतीय क्रमांकः वैष्णवी दशरथ तांबे (FYBSc IT)
*प्रश्नमंजुषा स्पर्धा*(महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी) २३ जानेवारी २०२६ प्रथम क्रमांकः बुपाली उदय पवार (SYBMS)द्वितीय क्रमांकः प्रसिद्धी सत्यवान जोईल (FYBSc IT) तृतीय क्रमांकः मृदुला संजय तिलोंटकर (TYBCom)
*जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा* *(वरिष्ठ गट) २७ जानेवारी २०२६* प्रथम क्रमांकः सुरभी दिपक चिंचककर (TYBMS) आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा, ता.मालवण द्वितीय कमांकः प्रसिद्धी सत्यवान जोईल (FYBSc IT) श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड तृतीय क्रमांकः आस्था संदिप नाईकधुरे (FYBSc IT) थी. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड
*जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा* *(कनिष्ठ गट) २७ जानेवारी २०२६*
प्रथम क्रमांकः गायत्री लक्ष्मण पाडी (इयत्ता ९वी)
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल,मुटाट, ता. देवगड
द्वितीय क्रमांक : कु. जान्हवी प्रेम पाळेकर,डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट, ता. देवगड
तृतीय क्रमांकः सावली हेमंत घाडी (इयत्ता ९वी अ) श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर,पडेल ता.देवगड.
*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २८जानेवारी २०२६*
प्रथम क्रमांकः आर्या सत्यवान जोईल (११ Sci A) श्री. स. ह.केळकर महाविद्यालय, देवगड
द्वितीय क्रमांकः वैभवी सतिश परब (TYBBI)
श्री. स. ह.केळकर महाविद्यालय, देवगड
तृतीय क्रमांकः प्रसिद्धी मत्यवान जोईल (FYBSc IT)
श्री. स. ह.केळकर महाविद्यालय देवगड
या स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन समृद्ध अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
समारोपीयअध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी मराठी भाषेची सद्य स्थितीवर प्रकाश टाकला.ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की,जगामध्ये सर्वत्र विविध मोठ्या पदावर जे भारतीय विराजमान आहेत त्या बहुतेकांचे शिक्षण हे मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून झाले आहे.मातृभाषेतून शिक्षण झाल्याने आकलन नीट होते.नंतर इंग्रजी असो वा अन्य भाषा शिकण्यास कोणतीही अडचण येत नाही कारण संकल्पना पूर्णपणे समजलेल्या असतात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश तेली यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. संतोष गिडये यांनी मानले.
हा सोहळा मराठी भाषेच्या गौरवासाठी, विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेम व अभिमान जागृत करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी व मान्यवर यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकत्र येऊन भाग घेतला. मराठी ही फक्त भाषा नसून आपली संस्कृती, इतिहास व अस्मितेचे प्रतीक असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


