मोंड तिठा ते भैरी मंदिर रस्त्याची ‘चाळण”

0
Google search engine

मोंड तिठा ते भैरी मंदिर रस्त्याची ‘चाळण”

चिरे वाहतुकीमुळे रस्ता गेला उखडून

दुचाकीस्वारांना सहन करावा लागतो त्रास

निवडणुका संपल्या, आतातरी रस्ता दुरुस्त करा – ग्रामस्थांची मागणी

देवगड : प्रशांत वाडेकर (कोकण वार्ता )

देवगड तालुक्यातील मोंड तिठा ते भैरीचे मंदिर या मुख्य मार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होणारी चिरे वाहतूक या दुरावस्थेला कारणीभूत ठरली असून, प्रशासनाने आतातरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी तीव्र भावना स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे.

​मोंड तिठा ते भैरी मंदिर हा मार्ग अनेक गावांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबर पूर्णपणे उखडले गेले आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, रस्ता शोधण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. विशेषतः दुचाकी चालकांना या मार्गावरून गाडी चालवताना कसरत करावी लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

​या परिसरातून होणारी अवजड चिरे वाहतूक या रस्त्याच्या दुरवस्थेचे मुख्य कारण ठरत आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणाऱ्या ट्रकमुळे रस्त्याची खडी पूर्णपणे बाहेर आली आहे. धूळ आणि उखडलेले दगड यामुळे पादचारी आणि इतर वाहनचालक हैराण झाले आहेत.

​प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.