देवगड / प्रतिनिधी
माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी सायंकाळी महाशिवरात्री यात्रोत्सव निमित्त श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत देवगड आंबा बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष काका ढोके, आंबा बागायतदार व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, उपाध्यक्ष गणेश वाळके, सचिव हेमंत वातकर आदी उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते श्री. शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.


