गोव्यातील माय-लेकाची गळफास लावून आत्महत्या

0
Google search engine

 

 

​देवगड (प्रतिनिधी):

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. देवगड तालुक्यातील एका होम-स्टेमध्ये वास्तव्यास असलेल्या गोव्यातील माय-लेकाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शारदा कृष्णा गावडे (६४) आणि सुदेश कृष्णा गावडे (३५) अशी मृतांची नावे असून, या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्रवासाच्या दिवशीच संपविले जीवन

​गावडे कुटुंबीय शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) रात्री ८:३० च्या सुमारास देवगडमध्ये दाखल झाले होते. शनिवारी सकाळी देवदर्शन करून ते पुढील प्रवासाला निघणार होते. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंत खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही. होमस्टेच्या मालकांनी आणि त्यांच्या पत्नीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, आई आणि मुलाचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.

तपासाचे चक्र वेगाने

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत अप्पर​  पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.

​पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि हवालदार महेंद्र महाडिक हे या आत्महत्येमागील नेमके कारण शोधत आहेत.