देवगड प्रतिनिधी
: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांच्या देवगड तालुका समन्वयकपदी प्रा.अक्षता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी येथिल गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात २८ जुलै रोजी करिअर कट्टाची एकदिवसीय विभागीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत प्रा.अक्षता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली. शिरगाव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या त्या अर्थशास्त्र विभागप्रमुख आहेत. त्या करिअर कट्टा उपक्रमांच्या राज्यस्तरीय स्टेट रिसोर्स सेंटर उद्योजकता विकास समिती आणि राज्यस्तरीय करिअर संसद समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांना करिअर कट्टा अंतर्गत आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ तसेच सलग दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक पुरस्कार पटकाविला आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मार्फत दिल्या जाणाऱ्या सन २०२४-२५च्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत करिअर कट्टा अंतर्गत देवगड तालुकास्तरावरील पुढील उपक्रम राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे, जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.अक्षता मोंडकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
निवडीबद्दल शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले सर्व संस्था पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधिर साटम, प्राचार्य समीर तारी यांनी अभिनंदन केले


