नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

Google search engine

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

 

देवगड : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवगड मंडळाचे सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर तसेच पाणीपुरवठा सभापती व प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या वतीने देवगड-जामसंडे शहरातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळ खडपे, मंडळ अध्यक्ष राजा भूजबळ, महिला मंडळ अध्यक्षा उषकला केळुसकर, शहराध्यक्ष वैभव करगुंटकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठुकरूळ, नगरसेविका रुचाली पाटकर व मनिषा जामसंडेकर, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, शक्ती केंद्र प्रमुख सुभाष धुरी, राजेंद्र वालकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, संजय तारकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, बूथ अध्यक्ष रविंद्र चिंदरकर, नरेश डांबरी, ललित चांदोस्कर, शिक्षकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून पालकांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.