रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Google search engine

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

७० दात्यांनी केले रक्तदान

 

​देवगड: प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार ॲड. अजित गोगटे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते करण्यात आले.

​पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न देता समाजाप्रती कर्तव्य म्हणून या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

​या प्रसंगी भाजपचे देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपनगराध्यक्षा मिताली सावंत आणि देवगड मंडळ सरचिटणीस योगेश चांदोसकर ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियांका साळसकर, महिला तालुकाध्यक्ष उष:कला केळुस्कर, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका ॲड. प्रणाली माने, पाणी पुरवठा सभापती व नगरसेविका तन्वी चांदोसकर, ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर, आणि युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील , माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, नगरसेवक संतोष तारी, गटनेते शरद टूकरूल, रोहन खेडेकर, स्वच्छता सभापती बुवा तारी, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, तसेच माजी नगरसेवक व्हि. सी. खडपकर, ज्ञानेश्वर खवळे, सुभाष धुरी आणि बापू जुवाटकर, मिलिंद माने, अक्षता घाडी, पंकज दुखंडे, उल्हास मणचेकर आणि मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.