सावंतवाडी मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Google search engine

सावंतवाडी मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

– वेलकमिंग फ्रेम : प्रवेशद्वार, परिसराची आकर्षक सजावट

सावंतवाडी / प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आज उत्साहात स्वागत करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय इमारतीचे प्रवेशद्वार व परिसराची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वेलकमिंग फ्रेममध्ये फोटो काढण्याचा मनमुराद आनंद घेतला. या विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे स्वागताप्रित्यर्थ स्नेह भेट देखील देण्यात आली. शाळेविषयी आस्था वाढविणारी श्रवणीय गाणी ऐकून विद्यार्थी देखील नवीन शैक्षणिक वर्षासाठी उत्साहाने सज्ज झाले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. हसत- खेळत, आनंददायी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सर्व विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.
—————